पुणे - आरटीपीसीआर टेस्टच्या बाबतीत डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आहे. डॉक्टर आणि पॅथॉलॉजी यांनी आरटीपीसीआर टेस्ट किट वापरताना स्टँडर्ड किटच वापरले पाहिजे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -रांजणगाव : महिलेचा विनयभंग करून फरार झालेला आरोपी अखेर जेरबंद
ज्या वेळेला देशासह राज्यात कोविडची व्याप्ती वाढत होती, तेव्हा आपल्या येथे आरटीपीसीआर टेस्ट किटचा तुटवडा जाणवत होता. मागच्या वर्षी सुरवातीला मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात या किटचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे, आवश्यक तेवढे दिवसाला टेस्ट होत नव्हते, त्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या कंपन्यांना हे किट बनवण्यासाठी परवानगी देण्यात आली. आणि प्रमाणित असे किट तेव्हा बनवण्यात आले. परंतु, दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि आरटीपीसीआर टेस्टची जास्तीची गरज भासली आणि तेव्हा प्रामाणिभूत नसलेल्या किट बाजारात आल्या आणि त्यावरचे नियंत्रण कदाचित न झाल्याने बनावट किट बाजारात आल्याने अनेक रुग्णांचे निदान हे चुकीच्या पद्धतीने झाले असल्याची शक्यता आहे, असे मतही डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.
सर्वत्र योग्य आणि विश्वासू म्हणून आरटीपीसीआर किटचा वापर
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. जगभरात ही टेस्ट वापरली जाते. कोरोनाच्या निदानासाठी सर्वत्र योग्य आणि विश्वासू म्हणून आरटीपीसीआर टेस्टकडे पाहिले जाते. या टेस्टवर 95 टक्के विश्वास केला जातो. फक्त 5 टक्के यात निकाल चुकू शकतात. किंवा फॉल्स पॉझिटीव्ह फॉल्स निगेटिव्ह येऊ शकतो. ही किट अतिशय गुंतागुंतीच्या शास्त्रीय पद्धतीने बनवण्यात आली आहे. यात स्टँडर्ड काटेकोरपणे सांभाळावा लागतो. हे किट जर त्या पद्धतीने बनवले गेले नाही तर याची विश्वासार्हता कमी होईल. आणि याचे प्रमाणीभूत हे एफडीए किंवा आयसीएमआर तपासूनच पुढे बाजारात येत असते, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.