पुणे:- गेल्या चार महिन्यांपासून एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपाचा तोडगा अजूनही निघालेला नाही. गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली एस टी पुन्हा सुरू व्हावी यामागणीसाठी पुण्यात एस टी बचाव कृती समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याबाहेर निदर्शने करण्यात आली.
ST Workers Agitation : एस टी सुरू करा या मागणीसाठी एसटी वाचवा बचाव कृती समितीचे आंदोलन - एसटी वाचवा बचाव कृती समिती
आंदोलक एस टी कामगारांनी देखील विलीनीकरणाचा विषय जास्त न लांबवता सर्वसामान्य जनतेचा विचार करावा असेही यावेळी एस टी बचाव कृती समितीचे नितीन पवार यांनी सांगितले.
![ST Workers Agitation : एस टी सुरू करा या मागणीसाठी एसटी वाचवा बचाव कृती समितीचे आंदोलन ST Workers Agitation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14812493-463-14812493-1648037921612.jpg)
लवकर एसटी सुरू करण्याची मागणी
आज सामान्य जनतेची मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. 4 महिने झाले राज्यातील एस टी ही बंद आहे. कामगार आणि सरकार यांच्यामधील खडाजंगीमुळे सामान्य जनता होरपळून जात आहे.एस टी बंद असल्याने शेती,शिक्षण,रोजगार यावर विपरीत परिणाम झाला आहे.त्यामुळे लवकरात लवकर एस टी सुरू करावी यामागणी साठी आज निदर्शने करण्यात आली आहे.अस देखील यावेळी नितीन पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा -Pankaj Dahane Inquiry : फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची चौकशी