पुणे -पुण्यातील अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुण्यातील या आठ ही गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवलेले आहे. Ashtavinayak Ganesh Mandal in Pune असा निर्णय जाहीर करण्यात आल होता. पण या निर्णयाच्या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने मंडळांनी आता आपली भूमिका जाहीर करत आम्ही या निर्णयाशी सहमत नाही, असे यावेळी म्हटले आहे. एकूणच आता पुण्यातील या अष्टविनायक मंडळामध्ये फूट पडली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आज झालेल्या अष्टविनायक मंडळाच्या पत्रकार परिषदेत श्रीमंत भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पूनित बालन यांनी पुढच्या वर्षी पुण्यातील 8 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे काश्मिर येथे आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणार आहेत. Srimanta Dagdusheth Halwai Ganapati Mandal यात श्रीनगरच्या लाल चौकासह राज्यात आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याबाबत पुण्यात या आठही गणेशोत्सव मंडळांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली होती. पण या निर्णयाशी आम्ही सहमत नसल्याचे दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.