पुणे -पुणे टेरर फंडिंग प्रकरणात जम्मू काश्मीर येथील किशतवाड येथून अटक करण्यात आलेल्या आरोपी आफताब हुसैन शाह याला आज ( शुक्रवार ) पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपी आफताब हुसैन शाह ( Accused Aftab Hussain Shah Pune terror funding case ) याला 14 जूनपर्यंत एटीएस कोठडी ( ATS custody ) सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात 24 मे ला पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुनैद मोहम्मद याची एटीएस कोठडी 7 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
Terror Funding Case Pune : आरोपी आफताब शाहला 14 जूनपर्यंत एटीएस कोठडी - पुणे टेरर फंडिंग प्रकरण काय आहे
पुणे टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपी आफताब हुसैन शाह ( Accused Aftab Hussain Shah Pune terror funding case ) याला 14 जूनपर्यंत एटीएस कोठडी ( ATS custody ) सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात 24 मे ला पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुनैद मोहम्मद याची एटीएस कोठडी 7 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.
बंदी असलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेत भरतीसाठी कार्यरत असलेल्या आफताब हुसेन शाह याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू- काश्मीरमधून काल अटक केली. त्याला तेथील स्थानिक न्यायालयाने प्रवासी कोठडी मंजूर केली असून, त्याला आज पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. आज विशेष न्यायालयाने आफताब याला 14 जूनपर्यंत एटीएस कोठडीत वाढ सुनावली आहे. यापूर्वी दापोडी परिसरातून अटक केलेल्या मोहम्मद जुनैद याच्या संपर्कात तो होता. आफताब हा मुळचा जम्मू-काश्मीरच्या किश्तवार प्रांतातील रहिवासी असून, तो व्यावसायाने सुतार आहे. त्याची तेथे जमीन देखील आहे. तो जुनैद मोहम्मद आणि विदेशात लष्कर ए तोयबासाठी काम करणाऱ्या हस्तकांचा संपर्कात होता. मोहम्मद जुनैद मोहम्मद याच्याकडे केलेल्या चौकशीत आफताब याची माहिती मिळाली होती.
हेही वाचा -तुझे लग्न दुसरीकडे होऊच देणार नाही! 40 वर्षीय प्रेयसीच्या धमकीने हताश प्रियकराची आत्महत्या