पुणे - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Reble MLA Eknath Shinde ) यांच्या बंडामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले ( Maharashtra Political Crisis ) आहे. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४० हून अधिक आमदार ( 40 Reble MLA With Eknath Shinde )आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
या बंडाच्या पार्श्वभूमीवरआता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांची भेट घेतली आहे. यानंतर आता 30 जून रोजी राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावले ( governor called special session ) आहे. असे सांगितल जाते आहे. यावर घटनातज्ञ उल्हास बापट ( Constitutional Expert Ulhas Bapat ) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आपले मत व्यक्त करताना त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.