महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Special Facility Auto Rickshaw : काय ती रिक्षा, काय त्यातील कुलर, काय ती बैठक, समद ओके हाय...; पुण्यातील सुंदरीची चर्चा - पुणे सुंदरी रिक्षा न्यूज

पुण्यातल्या सहकार नगर येथे राहणाऱ्या इरफान शेख यांनी पुण्याची सुंदरी रिक्षा बनवली ( special Facility Auto Rickshaw ) आहे. ही रिक्षा बनवताना त्यांनी बायकोवर एवढे खर्च केला नाही तेवढा खर्च या रिक्षावर केला आहे. तब्बल 12 लाखाहून अधिक खर्च या रिक्षामध्ये इरफान याने केला आहे. तीला पाहिल्यानंतर सहजच आपल्या तोंडून हा डॉयलॉग बाहेर पडतो. काय ती रिक्षा.. काय ती सीट, काय तो कुलर, काय ती स्क्रिन, काय तो फ्रिज. समद ओके हाय बघा..

Special Facility Auto Rickshaw
पुण्यातील सुंदरीची चर्चा

By

Published : Jul 2, 2022, 9:11 PM IST

पुणे - सध्या राज्यात राजकीय भूकंप सुरू असताना सांगोल्याच्या आमदारांचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच फेमस होत आहे. गुवाहाटीमध्ये असल्याने शहाजी बापू पाटील यांचा तो डायलॉग काय ते हॉटेल, काय डोंगर, काय ती हिरवळ, समद ओके आहे बघा... या डॉयलॉगने राज्यभर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. पुण्यात ही त्याचप्रमाणे एका रिक्षा चालकाने बनवलेल्या रिक्षाकडे पाहिल्यावर असेच म्हणावेस वाटते आहे. काय ती रिक्षा.. काय ती सीट, काय तो कुलर, काय ती स्क्रिन, काय तो फ्रिज. समद ओके हाय बघा..

पुण्यातील सुंदरीची चर्चा

12 लाखाहुन अधिक खर्च - पुण्यातल्या सहकार नगर येथे राहणाऱ्या इरफान शेख यांनी पुण्याची सुंदरी रिक्षा बनवली ( special Facility Auto Rickshaw ) आहे. ही रिक्षा बनवताना त्यांनी बायकोवर एवढे खर्च केला नाही तेवढा खर्च या रिक्षावर केला आहे. तब्बल 12 लाखाहून अधिक खर्च या रिक्षामध्ये इरफान याने केला आहे.

ऑटोमधील सुविधा - ज्या सुविधा मोठे मोठ्या वाहनांमध्ये असतात. त्याच सुविधा या रिक्षामध्ये आहेत. आकर्षक अशी रिक्षाच्या बाहेर सजावट करण्यात आली आहे. आतमध्ये एलईडी स्क्रीन, छोटा फ्रिज, कुलर, आकर्षक अशी लायटिंग, दोन झुमर, मेडीकल बॉक्स आणि बीएम्डबल्यूची बैठक व्यवस्था अश्या पद्धतीने इरफान यांनी यात व्यवस्था केली आहे.

अपंगांना मोफत सेवा - पुणे शहरात अशा प्रकारची आगळी वेगळी जुगाड रिक्षा बनवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. शेख हे मूळचे पुण्याचेच एक छंद म्हणून ते रिक्षा चालवण्याचे काम ते करतात. मला आवड असल्याने मी ही रिक्षा बनवली आहे. ही रिक्षा बनवण्यामागचा एक उद्देश आहे की, रिक्षात ग्राहक बसताना त्यांना बसण्यासाठी शीट चांगल्या पद्धतीचे बनवणे अपेक्षित आहेत. आपल्या रिक्षात माणूस एकदा बसला की त्याने पुन्हा जाण्यासाठी आपलीच रिक्षा मागवली पाहिजे. तसेच अंध आणि अपंगांना या माध्यमातून मोफत सेवा देण्याचा या मागचा उद्देश आहे, असे देखील यावेळी ऑटोवाले इरफान याने सांगितले आहे.

पुण्याच्या सुंदरीने अनेक नंबर पटकावले - पुणे, पिंपरी चिंचवड आणि सातारा भागातून सेवा देण्याचे काम शेख करत आहेत. याशिवाय मोठ्या घरामध्ये जसे आपणवर झुंबर लावतो तसे झुंबर या रिक्षात देखील लावण्यात आले आहे. तसेच रात्रीच्यावेळी ही रिक्षा अतिशय आकर्षण लायटिंगमुळे सुंदर दिसते. प्रवाशांना ही वाटेल की आपण कशातून प्रवास करतो ते. त्यांनी बनवलेल्या रिक्षात देखील वाढीव कुठलाही भाव नाही. जो आपण इतर रिक्षांना देतो. तोच भाव या रिक्षालाही आहे. अनेक स्पर्धेत या पुण्याच्या सुंदरीने नंबर पटकावलं आहे.

हेही वाचा -Assembly Speaker Election : सत्तासंघर्षात अध्यक्षपद कोणाकडे जाणार? भाजप-सेनेमध्ये रस्सीखेच

ABOUT THE AUTHOR

...view details