महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganesh Chaturthi 2022 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या श्री पंचकेदार मंदिराची खास सजावट, विद्युतरोषणाईचा लखलखाट - Ganesh Chaturthi

यंदा गणेशोत्सवासाठी खास तयारी करण्यात आली Ganesh Chaturthi 2022 आहे. भाविकही दुसरीकडे उत्सुक Devotees are curious आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टतर्फे महेश सूर्यवंशी आणि हेमंत रासने यांनी दिली. बुधवारी प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून गरुड रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले गरुड रथावर लावण्यात येणार आहेत. सुभाष सरपाले यांनी ही सजावट केली आहे. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी सव्वाबारा पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Ganesh Chaturthi 2022
श्रीमंत दगडूशेठ हलवाई

By

Published : Aug 25, 2022, 1:09 PM IST

पुणेश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला बुधवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यंदा गणेशोत्सवासाठी खास तयारी करण्यात आली Ganesh Chaturthi 2022 आहे. भाविकही दुसरीकडे उत्सुक Devotees are curious आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टतर्फे महेश सूर्यवंशी आणि हेमंत रासने यांनी दिली. बुधवारी प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून गरुड रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले गरुड रथावर लावण्यात येणार आहेत. सुभाष सरपाले यांनी ही सजावट केली आहे. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी सव्वाबारापासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई


गणपतीचा हा श्रीपंचकेदार मंदिर राजप्रासादभगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्रीपंचकेदार मंदिरप्रासाद विराजमान आहे. हे मंदिर केवळ देखावा नसून या मंदिर उभारणीत अनेक प्रतीकांचा, मूर्तींचा आणि लक्ष, लक्ष दिव्यांचा वापर केलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा श्रीपंचकेदार मंदिर राजप्रासाद, अनेक देवी-देवतांच्या, व्याल, शार्दुलांच्या, यक्षगणांच्या, सुरसुन्दरी, कमलपुष्पांच्या उत्तुंग शिखरांनी शोभित झाला आहे. श्रीपंचकेदार मंदिर राजप्रासादाच्या उत्तुंग कैलास शिखरावर सुवर्ण कलशाचा आमलक असून, त्यावर सिध्द ओंकाराच्या त्रिशूल डमरूच्या ध्वजदंडाने शोभायमान झाला आहे. नागांच्या नक्षीदार लतिन कमानीच्या शिखरावर, चारी दिशांना शिव शक्तीचे, अर्थातच शिवपार्वती मूर्तींचे वास्तव्य आहे. याशिवाय मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२१ झुंबर लावण्यात आली असून मारणे इलेक्ट्रीकल्स यांनी लावलेली आहेत. तर, शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केले आहे.


यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिर वैशिष्टय श्री पंचकेदार मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आडव्या भागावर, दोन्ही बाजूस असलेल्या गवाक्षात एकूण २८ सुरसुन्दरी आहेत. या सुरसुन्दरी ७ आणि ७ अशा गटांत असून सप्त नद्या, सप्त सुरु यांच्या प्रतिनिधी आहेत. त्याच्या खालच्या आडव्या पट्ट्यात गंधर्व, स्त्री-पुरुष नृत्य, गायन करत आहेत. असा हा शिखराचा भाग अनेक शिवगण, सुरसुन्दरी, गंधर्व, शार्दुल, नाग इत्यादींनी व्यापलेला आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्तंभाच्या रांगा आहेत. या स्तंभांच्या वरती दोन्ही बाजूस १८ मोरांच्या रांगा असून, स्तंभांच्या मध्य भागावर, बाहेरच्या बाजूने कमळनाळ घेतलेल्या ४४ सुरसुन्दरी प्रत्येक बाजूवर आहेत. तर आतल्या भागावर असलेल्या सुरसुन्दरी नमस्कार मुद्रेत असून त्या गणेश भक्तांना नमन करत आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या स्तंभांवर मोद, प्रमोद नावाचे गणेशाचे द्वारपाल उभे आहेत. तर त्यांच्या बाजूला दोन भैरव मूर्ती आहेत. नागांच्या किनातीने आणि कमानीच्या नक्षीदार बाकाने हे प्रवेशद्वार भक्तांना आनंद देते. इथून आपली नजर आत गर्भगृहात विराजमान असलेल्या प्रत्यक्ष श्रीमंत दगडूशेट हलवाई गणेशाच्या त्रैलोक्य सुंदर मूर्तीकडे जाते. दोन्ही बाजूस कमानीचे सहा स्तंभ दिसतील, त्यावर मोठे नक्षीदार व्याल दिसतील. हे स्तंभ आणि व्याल षड्रीपुंची प्रतीके आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, आणि मत्सर हे ते सहा षड्रीपुं आहेत. श्रीचे आसन अष्ट स्तंभांच्या संगमरवरी मखरात विराजित आहे. हे स्तंभ आहेत अष्ट दिशांचे, अष्ट दिगपाल असलेल्या आणि अष्टमूर्ती शिवाच्या वास्तव्याचे. मखरावर पृथ्वी, वरूण, अग्नी, वायू, आदित्य आकाश, चंद्र, आणि नक्षत्र या अष्टवसुंचा कलश असून, त्यावर अष्ट नागांचे अर्थात अनंत, गुलिक, वासुकी, संकपाल, तक्षक, महापद्म, पद्म आणि कर्कोदक नावाच्या नागांचे कोंदण आहे. सहस्त्र सूर्याच्या तेजाने झळकत असलेले हे मखर नागांच्या अनेक कलशांच्या नक्षीदार रांगांनी आभूषित झालेले आहे. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानासमोरील सजावट विभागात सजावटीचे काम पूर्ण होत आले असून अनेक कारागिरांनी याकरीता दिवसरात्र मेहनत घेतली आहे.

३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठणगुरुवार, दिनांक १ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय सूर्यनमस्कार, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी १ ते सायंकाळी ४ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री गणेशयाग व दुपारी १ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने लक्षअर्चनासहित नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत. दिनांक दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत मंत्र जागर होणार आहे. अनंत चतुर्दशीला दिनांक ९ सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री स्वानंदेश रथातून निघणार आहे.



१५० कॅमे-यांचा वॉचगणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमेऱ्यांचा वॉच पुणे शहर मनपा, पिंपरी चिंचवड मनपा यांसह कँन्टोमेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशता अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. दिनांक ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे.


ऑनलाईन दर्शनाची देखील व्यवस्था श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचाOffice of Profit Case हेमंत सोरेन यांच्यावर संकट, निवडणूक आयोगाचे अपात्र ठरवण्याचे पत्र पोहोचले राजभवनात, राज्यपालांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details