पुणे -हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयात सिहांना कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर, कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात प्राण्यांची अधिक काळजी घेतली जात आहे, गेल्यावर्षी देखील नियर येथील एका वाघाला कोरोना झाला होता. या पार्श्वभूमीवर प्राण्यांची अधिक काळजी घेतली जात आहे. झु किपरला सॅनिटायझर, डबल मास्क, ग्लोज घालने बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी सिंह आहेत त्या जागेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच प्राणी मानसाच्या कमीत-कमी संपर्कात येतील याची विशेष काळजी घेतली जात आहे.
केंद्रीय पर्यावरण विभागाने हैदराबाद येथील घटनेनंतर देशातील सर्व प्राणिसंग्रहालयांना ज्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसारच कात्रज येथील प्राणी संग्रहालयात ही अंमलबजावणी केली जात आहे. तसेच येथील प्राण्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर सर्व प्राण्यांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. या प्राण्यांच्या दररोजच्या हालचालींची देखील नोंद करण्यात येत आहे. कात्रज येथील प्राण्यांना दररोज दीड टन खाद्यपदार्थ लागते, प्राण्यांना या खाद्यपदार्थातून प्रोटीन देखील देण्यात येत आहे. तसेच जे प्राण्यांना खाद्य देण्याचे काम करतात अशा सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.