महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नात्यांमध्ये दुरावा.. कोरोनावर उपचार घेऊन परतलेल्या आईला घरात घेण्यास मुलगा व सुनेचा नकार - कोरोनावर उपचार करून आल्यास महिलेला घरात घेण्यास नकार

कोरोनाच्या काळात रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना मागील वर्षभरात घडल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातूनही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर स्वतःच्या आईला घरात घेण्यास मुलाने आणि सुनेने नकार दिला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत महिलेला घरात प्रवेश मिळवून दिला.

corona treatment
corona treatment

By

Published : Mar 24, 2021, 3:24 PM IST

पुणे - कोरोनाच्या काळात रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना मागील वर्षभरात घडल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातूनही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर स्वतःच्या आईला घरात घेण्यास मुलाने आणि सुनेने नकार दिला होता. परंतु हे प्रकरण पोलिसांकडे गेले आणि पोलिसांनी दोघांचेही समुपदेशन केल्यानंतर त्यांनी या महिलेला आपल्यासोबत घरी नेले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नरे परिसरात राहणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या महिलेवर सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनातून बरे झाल्यानंतर या महिलेला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देत असताना त्यांनी मुलाला फोन करून तुमची आई बरी झाली असून तिला घेऊन जा, असे सांगितले. यावर मुलाने मात्र तिला तिकडेच कुठेतरी ठेवा, घरी पाठवू नका असे धक्कादायक उत्तर दिले. डॉक्टरांनी त्यानंतर वारंवार फोन करून संबंधित मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने उत्तर दिले नाही. डॉक्टरांनी नंतर सिंहगड पोलिसांशी संपर्क साधून हा संपूर्ण प्रकार त्यांच्या कानावर घातला.

घराला कुलूप घालून मुलगा व सून गेले बाहेर -


त्यानंतर सिंहगड पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी आणि संबंधित महिला रुग्णवाहिकेतून घरी गेले असता घराला कुलूप असल्याचे दिसले. यावेळी पोलिसांनी पुन्हा एकदा या मुलाला संपर्क साधला असता आम्ही बाहेर आलो असून आम्हाला येण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी बराच वेळ वाट पाहिली मात्र उशिरापर्यंत मुलगा घरी परत न आल्याने त्यांनी पुन्हा या महिलेला रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे अद्याप हस्तांतरित नाही


आज सकाळी पुन्हा पोलीस कर्मचारी या महिलेच्या घरी गेले असता मुलगा आणि सून दोघेही घरी होते. पोलिसांनी दोघांनाही सिंहगड पोलीस ठाण्यात बोलावून घेत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यांचे समुपदेशन केले. यावेळी मात्र सुनेने माझे वडील मृत झाले होते त्यामुळे आम्ही काल दिवसभर तिकडेच होतो असे सांगितले. त्यामुळे मी दुःखात होते आणि मला काय बोलावे कळतच नव्हते असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनीही त्यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला आणि आईला घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर या दोघांनीही कसलेही आढेवेढे न घेता आईला घरी नेले.

हे ही वाचा - आज गोव्याचा अर्थसंकल्प सादर होणार; 'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेला बळकटी देणार

ABOUT THE AUTHOR

...view details