पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून यामुळे २१ जण बाधित झालेले आहेत. यापैकी, १२ जणांना बरे करून घरी पाठवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. करोनावर प्रशासन हे जनजागृती करत असल तरी काही नागरिकांनी पुढाकार घेऊन शहरातील मुख्य चौकातील रस्त्यांवर करोना विषयी जनजागृती केली आहे. पेंटिंग च्या माध्यमातून 'कोई रोड पर ना निकले' आणि घरातच थांबावे, असे संदेश देण्यात आला आहेत.
नागरिकांनी बाहेर निघू नये, पेंटिंगमधून तरुणांनी दिला संदेश - news about coroan
गजानन बाजड, सिद्धार्थ इंगळे आणि अमोल सोमवंशी हे सध्या शहरात पेंटिंगच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. शहरातील मुख्य १५ ते १६ चौकात त्यांनी 'कोई रोड पर ना निकले' असा पेंटिंगमधून संदेश देत नागरिकांनी घरीच थांबावे आवाहन त्यांनी केले आहे.
गजानन बाजड, सिद्धार्थ इंगळे आणि अमोल सोमवंशी हे सध्या शहरात पेंटिंगच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. गजानन बाजड यांना पेंटिंगची आवड असून समाजासाठी काही तरी करायचे असा निर्धार केला होता. त्याच पार्श्वभूमीवर करोना विषयी जनजागृती करण्याच ठरले. यात त्यांनी मित्रांची मदत घेतली. मित्र ही याबाबत तयार झाले आणि शहरातील मुख्य १५ ते १६ चौकात त्यांनी 'कोई रोड पर ना निकले' असा पेंटींगमधून संदेश देत नागरिकांनी घरीच थांबावे असे आवाहनदेखील केले आहे. त्यांच्या या कृतीच सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे. शिवाय यामधून पेंटिंग करणाऱ्या व्यक्तींना समाजकार्य केल्याचे समाधान मिळत आहे.