पुणे- शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील प्रतिबंधित भागातील नागरिकांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये, कोणी बाहेरचा येऊ नये म्हणून आता काही भागात पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. बांबू लावूनही लोक मोठ्या प्रमाणात ये-जा करता. त्यामुळे लॉकडाऊन फक्त नावापुरते राहत असल्याने शहरातील गणेश पेठ या भागात चार ते पाच फुटाचे पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.
कोरोना : पुणे शहरातील पेठांमधील काही भाग पत्रे लावून बंद - पुण्यात रस्ते बंद
पुणे शहरात भवानी पेठ, कसबा पेठ, घोले रस्ता, येरवडा या क्षेत्रीय कार्यालयामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे.
पुणे शहरात भवानी पेठ, कसबा पेठ, घोले रस्ता, येरवडा या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून या भागात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, काही नागरिक खरेदीसाठी या भागातून त्या भागात जातात. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू ज्या त्या भागातच मिळाव्या म्हणून आजपासून पेठांमधील काही भागात पत्रे लावून सील करण्यात आले आहे.
शहरातील प्रतिबंधित भागातील अनेक ठिकाणी कमी जागेतील छोट्या-छोट्या घरात जास्त व्यक्ती असलेल्या कुटुंबाची अवस्था अर्थातच खूप वाईट आहे. घरात राहूनही त्यांना शारीरिक अंतर पाळता येणे मुश्कील होत आहे.