पिंपरी-चिंचवड (पुणे) -पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले पिंपरी मार्केट हे आजपासून (शुक्रवार) 28 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महानगरपालिका प्रशासनावर दोन वेळेस पिंपरी मार्केट बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील सोशल डिस्टन्सिंगंचा फज्जा; दोन वेळा बाजारपेठ बंदची प्रशासनावर वेळ हेही वाचा...कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना सरकारी निवासस्थानात राहण्याची मुभा - गृहमंत्री
पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळण्यात आल्यानंतर शहरातील मुख्य मार्केट नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. परंतु, नागरिकांनी मास्क न वापरता फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला आणि मार्केटमध्ये गर्दी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच मार्केट बंद करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले होते. त्यानंतर पुन्हा मार्केट सुरू करण्यात आले.
महानगरपालिकेच्या अटी आणि शर्तींसह दुकाने खुली करण्यास परवानगी दिली. मात्र, तेव्हाही नागरिक आणि दुकानदार, व्यापाऱ्यांनी नियमांची पायमल्ली केल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये म्हणून पिंपरी मार्केट आजपासून 28 जूनपर्यंत बंद असणार आहे