पुणे -मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Mosques Loudspeakers) यांनी मशिदीवरील भोंग्यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेने राज्यातील राजकारण तापले आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेच्या विरोधात आत्ता डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) आवाज उठवला आहे. स्वतःच्या स्वार्था राजकारणासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरू नये. तसेच जर औंरंगाबादमध्ये दंगल झाल्यास सर्वस्वी राज ठाकरे जबाबदार असतील, असे स्पष्ट मत डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष अझहर तांबोळी (SDPI Secretary Azhar Tamboli) यांनी व्यक्त केले आहे.
दंगे झाले तर सर्वस्वी जबाबदार राज ठाकरेच - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला भोंगे काढण्याचा 3 मे पर्यंत इशारा दिला आहे. या मुद्द्यावरून आता राज्यभरात राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्याला आता सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने याबाबत आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे औरंगाबाद येथे घेत असलेल्या जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारावी आणि परवानगी दिली तर त्यातून जर काही दंगे झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज ठाकरेच असतील, असे स्पष्ट मत डेमोक्रॅटिक पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.