पुणे :पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बांग्लादेशातून पुण्यात बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पुण्यातील खडकी परिसरातून अटक करण्यात आली आहे. लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या माहितीवरून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बनावट ( busted by Army Intelligence and Revenue Intelligence )नोटांचे बांगलादेश कनेक्शन उघड करताना २ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. खडकी बाजार परिसरातील एका पानपट्टीचालकासह तिघांना अटक करून ( 3 accused arrested in smuggling fake notes case ) त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ४०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
2 लाखांच्या बनावट नोटा 26 हजारात - गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गुड्डुने बांगलादेशाच्या सीमेवरून २ लाखांच्या या बनावट नोटा २६ हजार देऊन आणल्याचे तपासात सांगितले आहे. त्याला जेव्हा बनावट नोटांची आवश्यकता असते, तेव्हा तो बांग्लादेश सीमेवरील लोकांशी संपर्क साधून या बनावट नोटा तस्करी करून देशात आणत असल्याचे, पोलिसांना सांगितले आहे. अतुलकुमार नरेशकुमार मिश्रा (वय २३, रा. शेवाळे टॉवर्स, खडकी बाजार), रवी उर्फ सूरज वीरेंद्र शुक्ला (वय ३५, रा. नवा बाजार, खडकी), राजूलकुमार उर्फ गुड्डू भाई राजबहाद्दूर सेन (वय ४६, रा. लेक व्ह्यू सिटी, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.