महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर रूग्णांच्या जिवावर, अनेक प्रश्न उपस्थित..

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण तयारी नसताना हे कोविड सेंटर का सुरू केले, असा मुद्दा उपस्थित होतो आहे. या कोविड सेंटरमध्ये 800 बेड आणि त्यातील 600 ऑक्सिजन तर 200 व्हेंटिलेटर बेड असतील, असे सांगितले होते. मात्र, येथे केवळ 30 बेडना व्हेंटिलेटरची सुविधा आहे.

पुणे जम्बो कोविड सेंटर न्यूज
पुणे जम्बो कोविड सेंटर न्यूज

By

Published : Sep 3, 2020, 5:47 PM IST

Updated : Sep 3, 2020, 6:00 PM IST

पुणे -पुण्यातील सीओईपी जम्बो कोविड सेंटरमध्ये सुविधांची आणि उपचाराच्या उपकरणाची वानवा असल्याचे वास्तव समोर आले आहे. यानंतर आता हे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले कोविड सेंटर पूर्ण तयार नसतानाही इतक्या घाई गडबडीत का सुरू करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जम्बो कोविड सेंटर पुणे

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण तयारी नसताना हे कोविड सेंटर का सुरू केले, असा मुद्दा उपस्थित होत आहे. या कोविड सेंटरमध्ये 800 बेड आणि त्यातील 600 ऑक्सिजन तर 200 व्हेंटिलेटर बेड असतील, असे 23 ऑगस्टला झालेल्या उदघाटन कार्यक्रमात धडाक्यात सांगण्यात येत होते. मात्र, वास्तव वेगळेच आहे. अजूनही अपूर्ण अवस्थेत असलेल्या या कोविड सेंटरमध्ये केवळ 30 बेडना व्हेंटिलेटरची सुविधा आहे.

मुळात उद्घाटन कार्यक्रमात जाहीर केल्याने पुणे शहरातील, जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्याबाहेरीलही अनेक रुग्ण आशेने या कोविड सेंटरकडे येताहेत. मात्र, त्यांची घोर फसवणूक होते आहे. अत्यंत ढिसाळ नियोजन असून एकदा रुग्ण आत गेल्यावर नातेवाईकांना त्यांची कसलीच खबरबात मिळत नाही. आपल्या रुग्णावर नेमके काय उपचार केले जात आहेत किंवा केले जाताहेत की नाहीत, याची माहिती नातेवाईकांना मिळत नाही. एकंदरीतच अत्यंत सावळा गोंधळ याठिकाणी सुरू आहे, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

पुणे जम्बो कोविड सेंटर न्यूज

या कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाचा ही बोजवारा उडाला आहे. हे कोविड सेंटर लाईफलाईन या संस्थेला चालवायला दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून अजूनही डॉक्टर, नर्स इतर कर्मचारी असे एकूण 50 कर्मचारी अद्याप उपलब्धच झालेले नाहीत. तर, या सेंटर वर महापालिका, पीएमआरडीए किंवा जिल्हा प्रशासन यापैकी कोणाचे नियंत्रण आहे, हेच स्पष्ट होत नसल्याने अनागोंदी वाढली आहे. त्याची जबर किंमत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोजावी लागते आहे.

Last Updated : Sep 3, 2020, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details