skeleton of a young woman in Pune : दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली तरुणी; घोड नदीजवळ आढळला सांगाडा - सखुबाई घोडे तरुणी आत्महत्या
तरुणीने घोड नदीच्या परिसरात आत्महत्या केली ( young woman suicide near Ghod river ) होती. सहा महिन्यांनी तिच्या कुटुंबाला तरुणीचा सांगाडा ( skeleton of woman near river ) सापडला. तो त्यांनी जंगल परिसरात पुरला असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. तरुणीने आत्महत्या केली होती, असे कुटुंबाने पोलिसांना ( Ghodgaon police on woman suicide ) सांगितले आहे.
तरुणीचा आढळला मृतदेह
By
Published : Feb 18, 2022, 6:31 PM IST
|
Updated : Feb 18, 2022, 6:45 PM IST
पिंपरी ( पुणे )- पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा पुरलेल्या अवस्थेत सांगाडा ( skeleton of a young woman ) सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तो कुटुंबानेच पुरला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सखुबाई घोडे असे त्या तरुणीचे ( Sakhubai Ghode suicide in Pune ) नाव आहे.
तरुणीने घोड नदीच्या परिसरात आत्महत्या केली ( young woman suicide near Ghod river ) होती. सहा महिन्यांनी तिच्या कुटुंबाला तरुणीचा सांगाडा ( skeleton of woman near river ) सापडला. तो त्यांनी जंगल परिसरात पुरला असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. तरुणीने आत्महत्या केली होती, असे कुटुंबाने पोलिसांना ( Ghodgaon police on woman suicide ) सांगितले आहे.
सहा महिन्यानंतर कुटुंबाला सापडला हाडांचा सांगाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 04 फेब्रुवारी 2020 मध्ये सखुबाई ही तरुणी बेपत्ता झाली होती. असे घोडेगाव येथे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. परंतु, सहा महिन्यानंतर तिचा हाडांचा सांगाडा तिच्या कुटुंबाला आढळून आला. याची माहिती पोलिसांना न देताच तो त्यांनी पुरून टाकला. दरम्यान, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह कुटुंबाने जंगलात पुरला आहे. त्यानुसार, घोडेगाव पोलिसांनी तात्काळ कुटुंबाला चौकशीसाठी बोलावून माहिती घेतली. तेव्हा, सखुबाईने आत्महत्या केली होती.
आम्हाला सहा महिन्यानंतर समजले. तो सांगाडा आम्ही जमिनीत पुरला, असे पोलिसांना तरुणीच्या कुटुंबाने सांगितलं आहे. आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने ( API Jivan Mane ) यांनी तरुणीचा सांगाडा शोधून बाहेर काढला आहे. घटनेचा अधिक तपास घोडेगाव पोलीस करत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले. हेही वाचा-Congress Protest Against Girish Bapat : गिरीष बापटांच्या घराबाहेर काँग्रेसचे 'माफी मांगो' आंदोलन