पुणे- दरोडा टाकण्यासाठी खास मुंबईहून आलेल्या सहा जणांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेले सहाजण कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्याकडून चोरीचे वीस मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. यासोबत एका एअर गनचा समावेश आहे.
दरोडा टाकण्यासाठी खास मुंबईहून आलेल्या सहा जणांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. सातारा रस्ता भागात काही लोक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली असून दोघे फरार आहेत.
हेही वाचा -औषधांचा परवडणाऱ्या दरात पुरेसा पुरवठा करा; केंद्राचे राज्यांना निर्देश
आरोपींची चौकशी केल्यानंतर हे सर्व जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रेकी करण्यासाठी वापरण्यात येणारी चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. यामधून 25 मोबाईल, एक लोखंडी कोयता, एक धारदार सुरा, एक एअर गन सापडली आहे. संबंधित आरोपींकडून एकूण सहा लाख 74 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांनी दिली.