पुणे - काल पुण्यामध्ये कात्रज चौक भागात माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर गाडीवर हल्ला झाला. ( Uday samant car attacked pune ) या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह सहा जणांना अटक केली. तसेच, 15 जणांवर गुन्हा दाखल केला होता.
हे सगळे लोक त्या ठिकाणी नव्हते - सर्वांना आज बुधवार (दि. 3 ऑगस्ट)रोजी भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवाजीनगर हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फ असा युक्तिवाद करण्यात आलेला होता, की त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. ( attack on uday samant car ) परंतु, संजय मोरे आणि शिवसेनेतर्फ युक्तिवाद करणाऱ्या वकिलाने यामध्ये सगळे सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत. हे सगळे लोक त्या ठिकाणी नव्हते ते मंचावर होते. असे मत संजय मोरे यांच्या वकिलांचे आहे. ( uday samant katraj news ) कोर्टाने त्या सर्वांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे, असे वकिलाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका - राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर पुण्यातील कात्रज येथे काही अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर सामंत यांनी प्रतिक्रिया देताना कोणीही एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पळून जाणारनाही, असे सांगितले. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सामंत यांनी हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील सूत्रधारांना दिला. त्यानंतर त्यांनी मध्यरात्री ट्विट करतही प्रतिक्रिया दिली आहे.