पुणे - राज्यात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धार्मिकस्थळे खुली करण्यात आली आहेत. राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुनच मंदिर, मशीद, चर्चमध्ये भाविकांना प्रवेश दिला जावा, अशा सूचना देखील राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मंदिर खुली होऊन आज तीन दिवस होत असताना राज्यातील प्रसिद्ध मंदिरामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे मंदिर प्रशासनाकडून, भाविकांकडून पालन होते का, सध्या काय परिस्थिती आहे, याचा ईटीव्ही भारतकडून आढावा घेतला याच अंतर्गत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात काय परिस्थिती आहे याचा घेतलेला आढावा.
अनलॉकनंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील परिस्थिती व कोरोना नियमांचे होणारे पालन - श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर
राज्यात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धार्मिकस्थळे खुली करण्यात आली आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे मंदिर प्रशासनाकडून, भाविकांकडून पालन होते का, सध्या काय परिस्थिती आहे, याचा पुण्यातील दगडूशेठ मंदिराबाबत ईटीव्ही भारतकडून घेतलेला आढावा..
अनलॉकनंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील परिस्थिती
पाडाव्यापासून मंदिरे खुली होत असताना पहिल्याच दिवशी श्रीमंत दगडूशेठ मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती आणि गेले तीन दिवस बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक सकाळपासून येत असल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनपूर्वी मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीइतकी गर्दी जरी आता जाणवत नसली तरी भाविक लक्षणीयरित्या मंदिरात येत असल्याचे याठिकाणी दिसून आले. दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे या ठिकाणी काटेकोर पालन होत असल्याचे दिसून आले.
Last Updated : Nov 18, 2020, 7:37 PM IST