महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Dihe Murder Case : भाऊ-बहिणीनेच काढला भावाचा काटा; पाच वर्षानंतर झाला खुनाचा उलगडा - sister brother murders own brothers

फुरसुंगी गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टचे उसाच्या शेताजवळ असलेल्या कॅनॉलमध्ये १८ मार्च २०१७ रोजी एक मृतदेह आढळून आला होता. अकस्मात मृत्यु अशी त्यावेळी नोंद करण्यात ( sister brother murders own brothers ) आली होती. हा खून असल्याचे पाच वर्षांनी तपासादरम्यान आढळून आले आहे. ( Pune Dihe Murder Case )

Pune Dihe Murder Case
हडपसर पोलीस स्टेशन पुणे

By

Published : Aug 2, 2022, 7:30 PM IST

Updated : Aug 2, 2022, 8:20 PM IST

पुणे - पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एरंडवणा परिसरातील घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्रास देत असल्याच्या कारणावरुन भाऊ व बहिणीने दोघांच्या मदतीने आपल्या सख्या भावाला कॅनॉलमध्ये ढकलून देऊन त्याचा खून केल्याचा प्रकार तब्बल ५ वर्षांनी उघडकीस आला ( Pune Dihe Murder Case ) आहे.

तिघांवर गुन्हा दाखल - पंकज चंद्रकांत दिघे (वय २३, रा. भालेकर चाळ, एरंडवणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सुहास दिघे, आश्विनी आडसुळ, प्रशांत यांच्यावर गुन्हा दाखल केला. महेश बाबुराव धनपावडे (वय ३७, रा. देशमुखवाडी, शिवणे) याला अटक केली आहे. ( sister brother murders own brothers )

अकस्मात मृत्यूची केली होती नोंद - हा प्रकार १४ ते १८ मार्च २०१७ दरम्यान घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टचे उसाच्या शेताजवळ असलेल्या कॅनॉलमध्ये १८ मार्च २०१७ रोजी एक मृतदेह आढळून आला होता. अकस्मात मृत्यु अशी त्यावेळी नोंद करण्यात आली होती. त्याचवेळी डेक्कन पोलीस ठाण्यात पंकज दिघे याची बेपत्ता म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत तपास करत असताना तसेच साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत घराच्या वादातून पंकज दिघे याला कॅनॉलच्या पाण्यात ढकलून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

महेश धनावडे यांना घेतले ताब्यात - दिघे यांचे एरंडवणा येथे एका चाळीत घर आहे. सुहास दिघे आणि त्यांची बहिण आश्विनी आडसुळ यांचा भाऊ पंकज दिघे हा त्यांना राहते घर स्वत:च्या नावावर करण्याकरीता त्रास देत होता. त्या कारणावरुन त्यांनी प्रशांत व महेश धनावडे यांच्यासमवेत हा कट रचला. १४ मार्च २०१७ रोजी सायंकाळी पंकज याला तवेरा गाडीत घालून पळवून नेले. गाडीत मारहाण केली. त्याला हडपसर येथील कॅनॉलमध्ये ढकलून दिले. त्यानंतर पाच दिवसांनी सुहास दिघे याने डेक्कन पोलीस ठाण्यात भाऊ पंकज दिघे हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याच्या अगोदरच हडपसर पोलिसांना फुरसुंगी येथे एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्याची त्यावेळी ओळख पटली नव्हती. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतल्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात १९ मार्च २०१७ रोजी पंकज दिघे हा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन अनोळखी मृतदेहाची माहिती गोळा केल्यावर हडपसरमधील एक अनोळखी मृतदेहाचे वर्णन पंकज याच्याशी मिळते जुळते असल्याचे आढळून आले. त्यावरुन पोलिसांनी महेश धनावडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने या सर्व प्रकाराची कबुली दिली.

हेही वाचा - CNG Rate : देशात सर्वात महाग सीएनजी दर नागपुरात, अचानक झाली मोठी वाढ

Last Updated : Aug 2, 2022, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details