पुणे -माई या निघून नाही गेल्या तर वादळ होतं ते शांत झाले. निघून गेल्या हा शब्द कोणीही वापरू नका. आईसारख्या व्यक्ती या कधीच निघून जात नाहीत तर त्या जिवंत असतात, अशी भावनिक प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ (Mamta Sapkal) यांनी दिली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker), हजारो लेकरांची माय (Mother of Orphans) सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं मंगळवारी (4 जानेवारी) निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- माईंचे कार्य पुढे नेणार - ममता सपकाळ
सिंधुताई यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी ममता सपकाळ यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. माई या निघून नाही गेल्या तर ते वादळ शांत झाले. आई या व्यवस्थित होत्या, सगळ्यांची काळजी घेत होत्या. त्यांना मुलांची काळजी होती. आईनी ज्या पद्धतीचे संस्कार आम्हाला दिले, ज्या पद्धतीचे काम त्यांनी केलं, त्याच पद्धतीचे काम हे आम्ही अशाच पद्धतीने पूढे नेणार आहोत, असे ममता सपकाळ म्हणाल्या.
- सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन -