पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथील मंदिर इतिहासात पहिल्यादाच महाशिवरात्री दिवशी भाविकांसाठी बंद राहणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे शिवभक्तांविना महाशिवरात्र साजरी होण्याचा हा प्रसंग ओढवला आहे.
महाशिवरात्रीला श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार - भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद
महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. 10 मार्च ते 12 मार्चपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
महाशिवरात्री निमित्त देशभरात लाखोंच्या संख्येने भाविक भिमाशंकरला दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे मोठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. गर्दीतून होणारा संसर्गाचा धोका लक्षात घेता, यंदा गर्दी टाळुन कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भिमाशंकर आणि परिसरातील गावांमध्ये तीन दिवस संचार बंदीचे आदेश लागु केले आहेत. भाविकांना मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.
इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांविना साजरी करावी लागणार असून 10 मार्च ते 12 मार्चपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. भिमाशंकर परिसरातील पर्यटनही तीन दिवस बंद रहाणार आहेत. इतर गावांतील शिवमंदीरातही गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.