महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Firing on Merchant in Pune : पुण्यातील फॅशनस्ट्रिट परिसरात गोळीबार, व्यापारी जखमी - पुणे लाईव्ह न्यूज अपडेट

जखमी तौफिक शेख आणि जुल्फीकार शेख नावाचा व्यक्ती व्यापारी संघटनेचे संबंधीत आहेत. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादाचे स्वरूप मोठ्या वादात झाले. मंगळवारी रात्री तौफिक शेख हा फॅशनस्ट्रिट परिसरातील एबीसी फार्म नावाच्या दुकानाजवळ आला असताना त्याचवेळी जुल्फीकार तेथे छर्‍यांची बंदुक घेऊन पोहचला. तौफिक यांना पाहून त्याने तौफिक यांच्यावर बंदुक रोखत गोळीबार केला. ( Shooting on Merchant in Fashion Street )

firing in fashion street area of ​​pune
पुण्यातील फॅशनस्ट्रिट परिसरात गोळीबार

By

Published : Jun 14, 2022, 9:51 PM IST

Updated : Jun 14, 2022, 10:16 PM IST

पुणे -पुण्यातील कॅम्प येथील गजबजलेला फॅशनस्ट्रिट परिसरात गोळीबार झाल्याची ( Firing on Merchant in Pune ) घटना घडली. व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या पूर्वीच्या वादातून एकाने छर्‍याच्या बंदीकीतून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्याता तौफिक अख्तर शेख (45, रा. भीमपुरा कॅम्प, पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केले. जुल्फीकार शेख नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. (Shooting in Fashion Street area of Pune)

पुण्यातील फॅशनस्ट्रिट परिसरात गोळीबार, परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त
छर्‍यांची बंदुकीतू गोळीबार -जखमी तौफिक शेख आणि जुल्फीकार शेख नावाचा व्यक्ती व्यापारी संघटनेशी संबंधीत आहेत. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादाचे स्वरूप मोठ्या वादात झाले. मंगळवारी रात्री तौफिक शेख हा फॅशनस्ट्रिट परिसरातील एबीसी फार्म नावाच्या दुकानाजवळ आला असताना त्याचवेळी जुल्फीकार तेथे छर्‍यांची बंदुक घेऊन पोहचला. तौफिक यांना पाहून त्याने तौफिक यांच्यावर बंदुक रोखत गोळीबार केला. त्याने केलेल्या गोळीबारात तौफिक हा जखमी झाला आहे. गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी ऐन रात्रीच्यावेळी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -3 Drowned at Juhu : जुहू बीचवर ३ जणांना बुडून मृत्यू; पालिकेचे चौपटीवर न जाण्याचे आवाहन

Last Updated : Jun 14, 2022, 10:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details