पुणे -पिपरी चिंचवड शहरातील ( Pipri Chinchwad city ) पिंपळे गुरव परिसरामध्ये ( Pimple Gurav area ) एकअत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. फॅब्रिकेशन शॉपमध्ये ( Fabrication Shop ) पाच वर्षीय मुलाच्या अंगावर एक मोठी लोखंडी मशीन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू ( 5 year old boy died ) झाला आहे. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. युवान दौंडकर अस मृत्यू झालेल्या मुलाच नाव आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवान आपल्या आईसोबत वाशिंग सेंटर मध्ये गाडी धुण्यासाठी आला होता. त्यादरम्यान मयत मुलाची आई ही वॉशिग सेंटरला लागून असलेल्या गीता फॅब्रिकेशन शॉप मध्ये बसली होती. त्याच फेब्रिकेशन शॉप मध्ये आईच्या शेजारी राहून मुलगा देखील खेळत होता.
हेही वाचा -Umesh Kolhe PM Report : उमेश कोल्हे यांचा पीएम रिपोर्ट आला समोर; कॅरोटीन धमनी कापल्याने मृत्यू