महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 12, 2021, 8:48 PM IST

Updated : Oct 12, 2021, 9:21 PM IST

ETV Bharat / city

धक्कादायक : कब्बडी खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मानेवर कोयत्याने वारकरून केली निर्घृण हत्या

पुण्यात यश लॉन्स परिसरात मित्र-मैत्रिणींसोबत एक मुलगी कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी तिच्या नात्यातला एक तरुण आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्याने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. आणि त्याने असे काही केले... वाचा...

Shocking: A 14-year-old girl was stabbed to death in the neck
धक्कादायक : कब्बडी खेळणाऱ्या चौदा वर्षीय मुलीचा मानेवर कोयत्याने वारकरून केला खून

पुणे - शहरात आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीची कोयत्याने मानेवर वार करून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बिबवेवाडी मधील यश लॉन्स परिसरामध्ये मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डीसीपी नम्रता पाटील यांची प्रतिक्रिया

मृत मुलगी करत होती कबड्डीचा सराव -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली मुलगी ही इयत्ता 8 वी मध्ये शिकत होती. ती शाळेत कबड्डी खेळाडू होती. ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी तिच्या नात्यातला एक तरुण आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्याने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला.

मानेवर केले कोयत्याने वार -

यावेळी त्या मुलांनी तिच्या मैत्रिणींना लांब पळवून लावले. सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. ती खाली पडल्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर एकामागे एक असे वार करण्यास सुरुवात केली. अत्यंत भीषण पद्धतीने आरोपीने तिची निर्घृण हत्या केली आहे. धडापासून डोके वेगळे करण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यामधून दिसून येते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय -

खून केलेला कोयता आणि अन्य शस्त्र तेथेच टाकून आरोपी पसार झाले. दरम्यान, आरोपीकडे पिस्तुल देखील होते. ते त्याने गुन्हा करते वेळी काढता आले नाही. ते पिस्तुल त्याने तेथेच टाकून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा -प्रेम संबंधाच्या संशयातून पतीची हत्या; पत्नीला अटक तर साथीदार फरार

Last Updated : Oct 12, 2021, 9:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details