पुणे - शिरूर लोकसभेतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात मतभेद होते. त्यांच्यातील वैर सर्वश्रृत होते. मात्र, आज (२९ मार्च) शिवसेना खासदार शिवाजी पाटील यांनी लांडगे यांच्या कार्यालयास भेट देऊन चर्चा केली.
शिवाजीराव आढळराव पाटील यांची आमदार महेश लांडगे यांच्याशी 'दिलजमाई' - महेशदादा लांडगे
आता शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कट्टर विरोधकांना एकत्र यावे लागले आहे.त्यामुळेच आढळराव यांनी बँकफूट'वर जात महेश लांडगे यांची 'मनधरणी' केली आहे. आता महेशदादा लांडगे हे त्यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेणार आहेत.
शिवाजीराव पाटील आणि महेशदादा लांडगे यांच्यातील गेल्या पाच वर्षांपासून कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. महेश लांडगे यांच्या प्रत्येक कामात पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. यामध्ये मोशी कचरा डेपोचा प्रश्न असो, की 'वेस्ट टू एनर्जी'चा प्रकल्प, महेश लांडगे यांच्यावर पाटील निशाणा साधत होते. म्हणूनच आमदार लांडगे यांनी शिरूरच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. त्यामुळे शिवाजीरावांचे धाबे चांगलेच दणाणले होते. मात्र, आता शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कट्टर विरोधकांना एकत्र यावे लागले आहे.त्यामुळेच आढळराव यांनी बँकफूट'वर जात महेश लांडगे यांची 'मनधरणी' केली आहे. आता महेशदादा लांडगे हे त्यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेणार आहेत.
झालं गेलं विसरून जावा.. आता एकत्र काम करू. प्रचारात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन आढळराव पाटलांनी केले आहे. तर, आमदार महेश लांडगे म्हणाले की, 'देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. युतीचा 'धर्म' आम्ही पाळणार आहोत. निवडणुकीत युतीचाच प्रचार आम्ही करणार आहोत. भोसरी मतदारसंघातून आढळरावांना प्रचंड मतांची आघाडी घेऊन देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.