पुणे - शतकोनशतके पारतंत्र्यात घालवल्या नंतर खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र दिन म्हणजे ६ जून १६७४ शिवराज्याभिषेक दिन ( Shivrajyabhishek Day ). या दिवशी शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत घेतला. सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समतेने भरली. रयतेचे पालनपोषण करणारे सार्वभौम छत्रपती झाले. त्यामुळे आजही शिवरायांचे स्वराज्य हे भारतीयांच्या मनावर राज्य करते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून पुढील वर्षापासुन शिवस्वराज्य दिन ( Shivswarajya Din celebration ) हा राज्यातील एक गडकिल्ल्यावर साजरा केला जाणार असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी यावेळी दिली.
उभारली 51 फुटी स्वराज्यगुढी -जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गगनभेदी जयघोषात… रणशिंगाच्या ललकारीत… ढोलताशाच्या गजरात… मर्दानी खेळाच्या चित्तथरारात… एसएसमीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल स्मारक परिसर दणाणून गेला. निमीत्त होते शिवजयंती महोत्सव समिती आयोजित शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे. सोहळ्याचे हे सलग १० वे वर्षे होते. यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड आणि सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव उपस्थित होते. यावेळी उदय सामंत व उपस्थित माताभगिनी यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पुजन करुन ५१ फुट स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा - शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळेच ६ जून शिवस्वराज्य दिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. त्याच बरोबरीने यावर्षी ५१ गडांवर तसेच पुण्यातील १०१ गणेशोत्सव मंडळानी देखील स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा केला.अस यावेळी आयोजक अमित गायकवाड यांनी सांगितले.