महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे जवळील कात्रज घाटात 'शिवशाही बस' दरीत कोसळली, बचावकार्य सुरू - कात्रज घाटात शिवशाही बस दरीत कोसळली

पुणे शहराजवळील कात्रज घाटात शिवशाही बसचा अपघात. 50 फूट खोल दरीत कोसळली बस. 40 ते 50 प्रवासी बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती.

कात्रज घाटात शिवशाही बस दरीत कोसळली

By

Published : Nov 25, 2019, 2:46 PM IST

Updated : Nov 25, 2019, 3:16 PM IST

पुणे -शहराजवळील कात्रज घाटात आज सोमवारी दुपारच्या सुमारास शिवशाही बस दरीत कोसळल्याची घटना घडली. साधारणतः 50 फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे. बसमध्ये 40 ते 50 प्रवासी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

पुणे जवळील कात्रज घाटात 'शिवशाही बस' दरीत कोसळली, बचावकार्य सुरू

हेही वाचा... अजित पवारांच्या अनुपस्थित मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वीकारला पदभार

पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेली परिवहन महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात पन्नास फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण 40 ते 50 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

कात्रज घाटात शिवशाही बस दरीत कोसळली...

हेही वाचा... नांदेडमध्ये डेंग्यूचे थैमान; 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार ही बस पुणे ते सांगलीच्या दिशेने निघाली होती. कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर शिंदेवाडीजवळ या बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही बस पन्नास फूट खोल दरीत कोसळली. याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

Last Updated : Nov 25, 2019, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details