पुणे - कोरोनाचे निमित्त करून पार्लमेंट कसे होऊ दिले नाही, हे चंद्रकांत पाटील यांना माहीत नाही का, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. सरकार कोरोनाचे निमित्त करून अधिवेशन पुढे ढकलत असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती, त्यावर संजय राऊत बोलत होते.
'कोरोनाचे निमित्त करून आम्ही अधिवेशन पुढे ढकलत नाही' - chandrakant patil news
इंधन दरवाढीवर लोकांच्या भावना लक्षात घेऊन भाजपाने देशात, महाराष्ट्रात आंदोलन केले पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, असा टोमणा संजय राऊत यांनी मारला.
'भाजपा प्रमुख विरोधीपक्ष'
ते पुढे म्हणाले, की आम्ही कशासाठी घाबरू. आज ही 170चेच बहुमत आमच्याकडे आहे. आम्हाला बहुमताची चिंता नाही. संसर्गाची चिंता आहे. भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यांनी इंधन दरवाढीसारख्या मुद्द्यावर आंदोलन केले पाहिजे. भले नरेंद्र मोदी आंदोलनाच्या बाजूने नसले तरी इंधन दरवाढीवर लोकांच्या भावना लक्षात घेऊन भाजपाने देशात, महाराष्ट्रात आंदोलन केले पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, असा टोमणाही राऊत यांनी मारला.