महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

​'शिवसेनेचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आग्रही' - Pune

1995 साली भाजपचे 63 आमदार आणि शिवसेनेचे 78 आमदार होते. तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तोच फॉर्म्युला आतासुद्धा लागू राहील. आता आमचे अपक्ष धरून 125 आमदार आहेत तर, शिवसेनेचे 63 आमदार आहेत. हे असंच चालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेनेची युती होईल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असे काकडे यांनी सांगितले.

संजय काकडे

By

Published : Oct 29, 2019, 2:22 PM IST

पुणे- शिवसेनेत काही बडे नेते आहेत, शिवसेनेतील आमदारांचा त्यांना मानणारा वर्ग आहे. हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी ते आग्रही आहेत. मुख्यमंत्री कुणाचाही करा पण हे सर्व लवकरात लवकर संपवा आणि महाराष्ट्राने दिलेला कौल दोन्ही पक्षांनी स्वीकारावा अशी, या आमदारांची भूमिका असल्याची माहिती भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दिली.

संजय काकडे

हेही वाचा -पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप; मुंबईत कुटुंबीयांची निदर्शने

1995 साली भाजपचे 63 आमदार आणि शिवसेनेचे 78 आमदार होते. तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तोच फॉर्म्युला आतासुद्धा लागू राहील. आता आमचे अपक्ष धरून 125 आमदार आहेत तर, शिवसेनेचे 63 आमदार आहेत. हे असंच चालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेनेची युती होईल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असे काकडे यांनी सांगितले.

हेही वाचा -'अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचा विषय कधीच ठरला नव्हता.. त्यांना तर पाच वर्षे हवे असेही वाटेल'

काहीही करून युती व्हावी, अशी शिवसेनेच्या 45 आमदारांची इच्छा आहे. मुख्यमंत्रिपद भाजपला गेले तरी या आमदारांचा युती होण्यासाठी पाठिंबा आहे. मागील पाच वर्षे ज्याप्रमाणे सरकार सुरू होते, तसेच आताही व्हावे अशी, या आमदारांची इच्छा असल्याचे शिवसेनेतील बडे नेते बोलून दाखवत असल्याचेही काकडे यांनी सांगितले.

For All Latest Updates

TAGGED:

Pune

ABOUT THE AUTHOR

...view details