पुणे -राज्यातील विरोधी पक्ष सातत्याने महाविकास आघाडीवर राज्य संभाळण्यास अपयशी ठरलेले सरकार, असा ( Bjp Criticized Mahavikas Government ) आरोप करत असते. त्याला आता शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी ( Shivsena Tanaji Sawant ) प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाने त्यांचे आरोप करावे. तो त्यांचा अधिकार आहे. भाजपा म्हणजे जग नव्हे. भाजपा हा जगभरात नाही. आम्ही छूटपुंज्या लोकांच्या आरोपाकडे लक्ष देत नसून, भाजपाला गांभीर्याने घेत नाही, अशा शब्दांत सावंत यांनी भाजपाचा समाचार ( Shivsena Tanaji Sawant Criticized Bjp ) घेतला आहे.
पुण्यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shivsena Balasaheb Thackeray ) यांच्या जयंतीनिमित्त भव्य प्रतिकृतीला पुष्पहार आणि अभिवादन तानाजी सावंत यांनी केले. त्यानंतर सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांच काम कौतुकास्पद
"पुन्हा एकदा भारतात पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ( Tanaji Sawant On Cm Uddhav Thackeray ) यांची निवड करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळली, त्याचे कौतुक आज जगभर होताना दिसत आहे. यापेक्षा वेगळं सर्टिफिकेट देण्याची काय गरज आहे. मुख्यमंत्री आजारी असून देखील राज्यात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे," असे तानाजी सावंत म्हणाले.
शिवसेनेचे 20 टक्के राजकारण
"शिवसेना कधीही निवडणुकीसाठी काम करत नाही. हे राज्यातील जनतेला माहीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आजही शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत आहे. म्हणून आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठी काम करत असतो," असेही तानाजी सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -Latur Youth Murder : लातूरात तरुणाची निर्घूण हत्या, कारण अस्पष्ट