पुणे- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप ( Raghunath Kuchik Case ) करण्याऱ्या पीडित तरुणीने आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी ( BJP Leader Chitra Wagh ) आपल्याला सुसाईड नोट लिहायला लावल्याचा धक्कादायक आरोप या पीडित मुलीने केला आहे. यावर राजकीय भांडवल करण्यासाठी मुलींबाबतच्या गुन्ह्यांचा वापर करायला नको, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी ( Shivsena Leader Neelam Gorhe ) दिली आहे.
पुरावे तयार करण्याची प्रयोगशाळा विरोधी पक्षांनी सुरू केली - स्त्री आधार केंद्राच्या वतीने वेळोवेळी त्या पीडित तरुणीला सहकार्य करण्यात आले आहे. पीडितेवर कोणी दबाव आणत असेल तर त्याची चौकशी होईल. अनेक प्रकरणात पुरावे तयार करण्याची प्रयोगशाळा विरोधी पक्षांनी सुरू केली की काय अशी शंका येत असल्याची टीकाही गोऱ्हे, यांनी केली.