महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पाण्याच्या समस्येसाठी शिवसेनेचे पुणे महापालिकेसमोर 'आक्रोश आंदोलन' - ShivSena agitation in front of Pune Municipal Corporation for water problems

शहरातील गोखलेनगर, जनवाडी भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी शिवसेनेतर्फे महापालिका आवारात आक्रोश आंदोलन करण्यात आले..

शिवसेनेचे पुणे महापालिकेसमोर आंदोलन

By

Published : Nov 11, 2019, 6:43 PM IST

पुणे -शहरातील शिवाजीनगर मतदारसंघातील गोखलेनगर, जनवाडी भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी शिवसेनेतर्फे सोमवारी महापालिका आवारात आक्रोश आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिवाजीनगर समन्वयक प्रवीण दत्तू डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला होता.

पुणे महापालिकेसमोर शिवसेनेचे आंदोलन

हेही वाचा... अरविंद सावंत यांनी दिला केंद्रीय अवजड मंत्रिपदाचा राजीनामा

पाण्याची वेळ बदलण्यात यावी, गढूळ पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, पुरेसे दाबाने पाणी सोडण्यात यावे, दर गुरुवारची अघोषित पाणीकपात रद्द करण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा... 2020 मध्ये महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा - संजय निरुपम

4 फेब्रुवारी 2019 पासून गोखलेनगर, जनतावसाहत, जनवाडी, रामोशीवाडी, पीएमसी कॉलनी, लाल चाळ, हिरवी चाळ, पाच पांडव सोसायटी, गोलघर, वैदूवाडी, आशानगर, बहिरटवाडी या परिसरात पाणी अतिशय कमी दाबाने आणि गढूळ येत आहे. तसेच खूप उशिराने येत असल्याचे प्रवीण डोंगरे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही पाणी मिळण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले होते. वर्षभरापासुन पाठपुरवठा करूनही शासनाकडून फक्त खोटी आश्वासनेच मिळत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details