महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी; पुण्यात उसळली गर्दी - shivbhojan thali news

राज्य सरकारच्या शिवभोजन थाळीची सर्वत्र चर्चा आहे. पुण्यात मात्र हे थाळीवाटप कडक बंदोबस्तात सुरू आहे.

shivbhojan thali in pune
पुण्यात शिवभोजन थाळी बदोबस्तात

By

Published : Jan 29, 2020, 3:10 PM IST

पुणे - राज्य सरकारच्या बहुचर्चित शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. शहरातील एका शिवभोजन केंद्रावर तुफान गर्दी उसळल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात शिवभोजनाचे वाटप सुरू आहे.

पुण्यात शिवभोजन थाळी बदोबस्तात

शिवभोजन थाळीला याप्रकारे पोलीस बंदोबस्त द्यावा लागल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. शहरातील मार्केटयार्ड येथील उपहारगृहात शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू करण्यात आलायं.

पहिल्या दिवसापासूनच या केंद्रावर गर्दी उसळली आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी उपहारगृह चालकाने केली. त्यानुसार आता दररोज याठिकाणी पोलीस बंदोबस्तात या थाळीचे वाटप केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details