पुणेदसरा मेळावा शिवसेना की शिंदे गटाकडून होणार याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दसरा मेळाव्याबाबत Dasara Melava राज्यात राजकीय वातावरण हे चांगलेच तापले आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा येत आहे. आता दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटात सामील झालेले शिरूर मतदार संघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील Former MP Shivajirao Adhalarao Patil यांनी देखील आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की शिंदे गटाने दसरा मेळावा हा करावा अशी आमची इच्छा आहे. जो काही दसरा मेळाव्या बाबत निर्णय होईल तो चांगला व्हावा, असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत.
2 वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेट देऊन आरती करत आहेत. आज पुण्यात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ची शिंदे गटाचे नेते व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे Shirur Lok Sabha Constituency माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दर्शन घेऊन आरती केली.यावेळी त्यांच्याबरोबर परिवारातील सदस्य उपस्थित होते.त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.