पुणे - गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर स्वतः सावंत यांनी मौन ( Tanaji Sawant On BJP Joining ) सोडलं. ते म्हणाले की, मी भाजपात जाणार नाही. माझ्या विरुद्ध रचलेलं हे कुभांड आहे. मी माझ्या राजकीय कारकिर्दीत कधीच पक्षाविरोधात बोललो नाही. आणि जर मी काही बोललो असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल. मी पक्ष सोडणार आणि भाजप मध्ये जाणार आहे ही फक्त एक राजकीय चर्चाच आहे. पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पार पडत आहे. आमच्या पक्षात आदेश चालतो. जबाबदारी द्यायची की, नाही हे पक्ष ठरवेल, तसेच मी शिवसेना सोडणार नाही ( Not Leave Shivsena Says Tanaji Sawant ) असं देखील यावेळी सावंत म्हणाले.
तानाजी सावंत यांचा गौरव
मराठा सेवा संघ पुणे ( Maratha Seva Sangh Pune ) शहराच्यावतीने 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीपर्यंत रात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी जिजाऊरत्न सन्मान व जिजाऊ स्मृती सन्मान यांचे वितरण तंजावर तामिळनाडू येथील व्यंकोजीराजे यांचे थेट वंशज विजयराजे भोसले यांच्या हस्ते लाल महाल येथे पार पडले. यावेळी जिजाऊ रत्न म्हणून जयंत प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांना गौरवण्यात आले. तसेच योगाचार्य शिवमती सुमन कुसळे यांना जिजाऊ स्मृती सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.