पुणे - प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना पर्यावरण, हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या मुद्यांवरही आपण भर दिला पाहिजे. कार्बन उत्सर्जन थांबवण्याच्या प्रयत्नात सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम ( Global India Business Forum ) जागतिक स्तरावरील उद्योगांना एकत्रित आणून शाश्वत विकासासाठी ( Sustainable Development ) पुढाकार घेत आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ( Deputy Speaker of the Legislative Council Dr. Neelam Gorhe ) यांनी केले. ग्लोबल इंडिया बिझिनेस फोरमतर्फे (जीआयबीएफ) आयोजित 'बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२१' ( Business Excellence Award 2021 ) कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आर्थिक-सामाजिक संबंध दृढ होणारे अनेक उपक्रम महाराष्ट्र सरकार राबवत आहे. सामाजिक व आर्थिक बदलाना सामोरे जात महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी आपले स्वागत आहे. त्यांना आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार तत्पर असल्याचेही गोऱ्हे म्हणाल्या.
Neelam Gorhe Pune : हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या मुद्यांवरही आपल्याला भर देणे गरजेचे - डॉ. नीलम गोऱ्हे - बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२१ कार्यक्रम पुणे
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम ( Global India Business Forum ) जागतिक स्तरावरील उद्योगांना एकत्रित आणून शाश्वत विकासासाठी ( Sustainable Development ) पुढाकार घेत आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ( Deputy Speaker of the Legislative Council Dr. Neelam Gorhe ) यांनी केले.

अत्याधुनिक पायाभूत सुविधा, व्यापाराची मार्गदर्शक तत्वे, कुशल मनुष्यबळ अशा अनेक चांगल्या गोष्टी मोरोक्कोमध्ये उपलब्ध आहेत. भारतीय उद्योजकाना मोरोक्कोत आपला उद्योग सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते. अतिशय सुलभ पद्धतीने येथील व्यापाराच्या प्रक्रिया आणि प्रणाली आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन, ऊर्जा, ऑटोमोबाईल, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, हरित ऊर्जा क्षेत्रात चांगल्या संधी आहेत, असे 'मोरोक्को'चे मोहम्मद मलिकी म्हणाले. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या कॉस्टरिकामध्ये औषधनिर्माण, सिलिकॉन इंडस्ट्रीमध्ये व्यापाराच्या, तसेच ब्रॉडकास्टिंग साहित्य, पेट्रोलियम, बांधकाम साहित्य याची मोठी आयात होते. तर साखर, केळी, वैद्यकीय उपकरणे, ऑर्नामेंटल प्लांट्स याची निर्यात होते. पर्यटन क्षेत्र खुणावत आहे. भारतीय लोकशाही जगात सर्वात मोठी आहे. आम्ही भारताकडून अनेक गोष्टी शिकतो आहोत. कॉस्टरिका हे जगभरातील उद्योजकांसाठी एक नामांकित केंद्र बनत असल्याचेही यावेळी मलिकी म्हणाले. यासोबतच इतर मान्यवरांनीही आपली मतं व्यक्त केली.