पुणे - पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवत या तक्रारदार मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. (Shiv Sena Leader Raped Case filed) त्यानंतर तीचा जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचा पिडीतेने केला आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यदीनुसार हा प्रकार पुण्यातील प्राइड हॉटेल, गोव्यातील (बाय द बीच)या हॉटेलमध्ये (नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२२)मध्ये घडला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार (रघुनाथ कुचीक २४ वर्षाच्या तरुणीसोबत तिला लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शारीरिक संबंध ठेवले. (Shiv Sena deputy leader raped Case Filed in Pune) त्यातच ही तरुणी प्रेग्नेंट झाली आणि त्यानंतर आरोपीने बळजबरीने तरुणीचा गर्भपात केला. तसेच, या साऱ्या प्रकाराबद्दल जर कोणाला काही सांगितले तर जिवे मारीन अशी धमकी देखील दिली. याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये रघुनाथ कुचीक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील करत आहेत.
हेही वाचा - ISIS threatens Yasin Bhatkal : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील वकिलाला इसिसची धमकी