महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shiv Sainik Posterbaji in Pune : पुण्यात शिवसैनिकांची पोस्टरबाजी ; चिन्ह गोठवलंय पण रक्त पेटवलंय - निवडणूक आयोग निर्णय

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पुण्यात शिवसैनिकांच्या वतीने पोस्टरबाजी करण्यात आलेली Posterbaji against Election Commission decision आहे. युवासेना विस्तारक राजेश पळसकर यांच्या माध्यमातून पुण्याच्या नळस्टॉप चौक येथे हे पोस्टर लावण्यात आले (Election Commission decision shivsena symbol) आहे.

Shiv Sainik Posterbaji in Pune
पुण्यात शिवसैनिकांची पोस्टरबाजी

By

Published : Oct 10, 2022, 12:14 PM IST

पुणे :निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पुण्यात शिवसैनिकांच्या वतीने पोस्टरबाजी करण्यात आलेली Posterbaji against Election Commission decision आहे. चिन्ह गोठवलंय पण रक्त पेटवलंय, आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे या आशयाचं पोस्टर पुण्यात पाहायला मिळत आहे. युवासेना विस्तारक राजेश पळसकर यांच्या माध्यमातून पुण्याच्या नळस्टॉप चौक येथे हे पोस्टर लावण्यात आले (Election Commission decision shivsena symbol) आहे.


मिळेल ते चिन्ह लोकांपर्यंत पोहचवू -खरंतर पाकिस्तानला माहीत आहे की - शिवसेना कोणाची. पण निवडणूक आयोगाला माहीत नाही की शिवसेना कोणाची ? भाजपला राज्यात हिंदुत्वाच्या वोट बँकेत कोणताही भागीदार नकोय. म्हणून ते आज शिवसेना संपवायला निघाले आहे. पण त्यांनी जरी चिन्ह गोठवलं असल तरी आमचं रक्त गोठवू शकत नाही. आत्ता हे रक्त पेटलं आहे आणि जे काही चिन्ह आम्हाला मिळेल, ते लोकांपर्यंत लगेच पोहचवू. असं यावेळी पळसकर यांनी सांगितलं (Election Commission decision) आहे.

शिवसैनिक आक्रमक -निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटातील पक्ष चिन्हाबाबत निर्णय दिला आहे. आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. दोन्ही गटांना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' चिन्हावरून शिंदे - ठाकरे गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून याला शिंदे गट आणि भाजप जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह, घोषित केलं आहे. अजूनही शिंदे गटाकडून नाव तसेच चिन्हाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर शिवसैनिक हे आक्रमक झाले असून आत्ता जो चिन्ह मिळेल, ते राज्यातील जनतेच्या मनामनात पोहचवू असं शिवसैनिक सांगत (Shiv Sainik Posterbaji) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details