महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Womens day 2022: 40 हून अधिक अनोखे कार्ड बनवून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली - Womens day 2022

महिला किंवा स्त्री म्हटले म्हणजे महत्वाचे स्थान निर्माण करणारी, स्वत: पुढे येऊन अनेक अडचणींना सामोरे जाणारी बाई आपल्या डोळ्या समोर उभी राहते. महिलांना सध्या एक आदराचे स्थान दिले गेले आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपले कर्तुत्व सिद्ध करू बघते आहे. घरसंसार असो किंवा नोकरी आपली जबाबदारी ती पार पाडते आहे.

unique tribute Lata Mangeshkar by Shital Joshi
लता मंगेशकर कार्ड श्रद्धांजली

By

Published : Mar 8, 2022, 8:22 PM IST

पुणे - महिला किंवा स्त्री म्हटले म्हणजे महत्वाचे स्थान निर्माण करणारी, स्वत: पुढे येऊन अनेक अडचणींना सामोरे जाणारी बाई आपल्या डोळ्या समोर उभी राहते. महिलांना सध्या एक आदराचे स्थान दिले गेले आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपले कर्तुत्व सिद्ध करू बघते आहे. घरसंसार असो किंवा नोकरी आपली जबाबदारी ती पार पाडते आहे. आज जगात सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडत आहे. महिला दिनानिमित्त पुण्यातील शितल जोशी यांनी एका अनोख्या पद्धतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली दिली आहे.

माहिती देताना शितल जोशी

हेही वाचा -Pimpri : फडणवीसांच्या ताफ्यावर चप्पल भिरकवल्याने पिंपरीत राजकारण तापले; भाजप-राष्ट्रवादीचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

कार्डद्वारे देण्यात आली ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारीला निधन झाले. ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर देशातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण प्रेम करत असतात. पुण्यातील शितल जोशी या दरवर्षी महिला दिनानिमित्त आपल्या जवळच्या मैत्रिणींना स्वतः महिला दिनाचा कार्ड बनवून शुभेच्छा देत असतात. पण, यंदा त्यांनी भारतरत्न ज्येष्ठ गायिका यांच्या विविध फोटो आणि त्यांच्या गाण्याच्या 4 ओळी अशा 40 हून अधिक कार्ड बनवून भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली दिली आहे.

प्रत्येक कार्डवर लता मंगेशकर यांचे वेगेवेगळे फोटो लावण्यात आले

शितल जोशी या एका कंपनीत काम करत असून छंद म्हणून त्या वेळ मिळेल तेव्हा कार्ड बनवत असतात. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून त्या महिलादिनानिमित्ताने आपल्या जवळच्या मैत्रिणींना कार्ड बनवून शुभेच्छा देत असतात. पण, यंदा नुकतेच मागच्या महिन्यात ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले आणि त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी शितल यांनी 40 हून अधिक कार्ड बनविले आणि या प्रत्येक कार्डवर लता मंगेशकर यांच्या वेगवेगळ्या फोटो आणि त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांच्या ओळी लिहिल्या. अश्या पद्धतीने शितल यांनी अनोख्या पद्धतीने महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली दिली.

हेही वाचा -PUNE METRO : पहिल्याच दिवशी 22 हजार पुणेकरांचा मेट्रो प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details