महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी शेखर गायकवाड; मंत्रालयातून बदलीचे आदेश - pune municipal corporation news

महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. तर सौरभ राव यापुढे राज्याचे साखर आयुक्त म्हणून कामकाज सांभाळणार आहेत.

pune municipal commissioner
पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी शेखर गायकवाड

By

Published : Jan 21, 2020, 9:46 PM IST

पुणे - महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. तर सौरभ राव यापुढे राज्याचे साखर आयुक्त म्हणून कामकाज सांभाळणार आहेत. सौरभ राव हे सुरुवातीला पुण्याचे जिल्हाधिकारी, त्यानंतर महापालिका आयुक्त आणि आता साखर आयुक्त म्हणून पुण्यातच काम करतील.

हेही वाचा -नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे, 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

शेखर गायकवाड हे मूळचे शिरूर तालुक्यातील मलठणचे आहेत. त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1684 ला कृषी सेवा वर्ग पदासाठी निवड झाली होती. त्यांनी जिल्हा पुनर्विकास अधिकारी कोल्हापूर, मुख्यमंत्री व राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे.

हेही वाचा -डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला

तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्याही बदलीचे आदेश निघाले असून त्यांच्या जागी आयुष प्रसाद कार्यभार सांभाळणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी राज्यातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. त्यामध्ये तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details