महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शर्जीलचे वक्तव्य चुकीचे, मात्र त्यावर एवढ्या गदारोळाचे कारण काय? - बी जी कोळसे पाटील - elgar parishad

त्याने मनुवादाऐवजी हिंदू शब्द वापरला, ही चूक होती. त्याबद्दल त्याला स्टेजवरच याची जाणीव करून दिली होती असे स्पष्टीकरण एल्गार परिषदेचे आयोजक बी जी कोळसे पाटील यांनी दिले आहे.

शर्जीलचे वक्तव्य चुकीचे, मात्र त्यावर एवढ्या गदारोळाचे कारण काय? - बी जी कोळसे पाटील
शर्जीलचे वक्तव्य चुकीचे, मात्र त्यावर एवढ्या गदारोळाचे कारण काय? - बी जी कोळसे पाटील

By

Published : Feb 3, 2021, 2:28 PM IST

Updated : Feb 4, 2021, 8:42 AM IST

पुणे : एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने हिंदू धर्माविषयी केलेले विधान चुकीचेच आहे. त्याने मनुवादाऐवजी हिंदू शब्द वापरला, ही चूक होती. त्याबद्दल त्याला स्टेजवरच याची जाणीव करून दिली होती असे स्पष्टीकरण एल्गार परिषदेचे आयोजक बी जी कोळसे पाटील यांनी दिले आहे. आमच्या एल्गार परिषदेचा हेतू हा मनुवाद आणि मनीवाद हा सर्व समस्यांचे मूळ आहे हे समजावून सांगण्याचा असतो. त्यासाठी ही परिषद आम्ही आयोजित करतो असे कोळसे पाटील म्हणाले. मात्र हिंदू धर्मावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, शर्जील उस्मानीच्या एका वाक्यावरून गदारोळ करण्याची गरज काय? असे कोळसे पाटील म्हणाले. तो बोलला ते चूक होते मात्र त्याच्याआडून आमची बदनामी केली जाते आहे. मात्र आम्ही दरवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार असे कोळसे पाटील म्हणाले.

शर्जीलचे वक्तव्य चुकीचे, मात्र त्यावर एवढ्या गदारोळाचे कारण काय? - बी जी कोळसे पाटील
Last Updated : Feb 4, 2021, 8:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details