महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अक्षयतृतीयेनिमित्त 'दगडूशेठ'चा शारदेश मंगलम् विवाह सोहळा - पुणे दगडूशेठ गणपती बातमी

श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळविले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता, आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात.

shardesh mangalam wedding ceremony of  dagdusheth ganpati on occasion of akshay tritiya in pune
अक्षयतृतीयेनिमित्त 'दगडूशेठ'चा शारदेश मंगलम् विवाह सोहळा

By

Published : May 14, 2022, 8:43 PM IST

पुणे - वैशाख महिना हा सर्व देवतांना अतिशय प्रिय असतो. याच वैशाख महिन्यात वासंतिक फुले येतात. तसेच खूप रसाळ फळे देखील येतात. या फळांमध्ये फळांचा राजा आंबा हा विशेष असतो. त्याच निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 11000 आंब्यांचा बाप्पाला नैवेद्य दाखवण्यात आला. अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यासोबतच श्री गणेश आणि देवी शारदा यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन मंदिरात करण्यात आले.

आंब्यांची आरास - मंगलमूर्तींच्या भोवती केलेली आंब्यांच्या आरास आणि विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी - दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम् सोहळा थाटात पार पडला. सभामंडपात लग्नसोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके देखील झाली. श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळविले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता, आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात. शरद ऋतू मधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हणतात. अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतच्या महामीलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम आहे. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांनी लग्नसोहळ्याचे पौरोहित्य केले.

महेश सूर्यवंशी - कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट -सभामंडपात लग्नसोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके देखील झाली. श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळविले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात.

ABOUT THE AUTHOR

...view details