पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे नीतीश कुमार यांची भेट Sharad Pawar will meet Nitishkumar घेणार आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP state president Jayant Patil यांना विचारलं असता ते म्हणाले की, देशातील सर्वच पक्ष कमी अधिक प्रमाणावर आत्ता निष्कर्षावर आले आहेत की, या देशाची सत्ता आत्ता हुकूमशाही प्रवृत्ती कडे चालली आहे. देशातील सर्वच व्यवस्था पूर्णपणे झाकोळलेले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष एकत्र येण्याच्या भावना वाढीला लागलेली दिसत आहे. त्यामुळेच देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी प्रतिक्रिया पाटिल यांनी दिली.
गणपती कसबा गणपती मंडळाला भेट -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंडळाला भेट Jayant Patil visit to Ganpati Kasba Ganpati Mandal दिली. यावेळी ते बोलत होते. गणेश उत्सव Ganeshotsav Pune मोठ्या उत्साहात साजरा केलं जातं आहे. पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा होत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. काल केंद्रीय मंत्री यांनी पुण्यात उडती बस सुरू करणार अशी घोषणा केली, यावर पाटील यांनी टोला लगवत म्हटल आहे की, अजूनही उडती बस सुरू झालेली नाही. मी वाट बघितली. म्हणूनच मी चालत पुणे शहरातील सर्व गणपती करत आहे.
दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना दिशा - दसरा मेळाव्याबाबत Shiv Sena Dussehra gathering पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की दसरा मेळावा ठाकरे शिवाय दसरा मेळावा नाही. येणाऱ्या निवडणुकीत हे चित्र देखील स्पष्ठ होईल. दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली परंपरा आहे. शिवतीर्थावर ज्या प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचं दसरा मेळावा होत होता. ती, परंपरा उद्धव ठाकरे हे देखील त्याच पद्धतीने सांभाळत आहे. यंदा देखील तोच दसरा मेळावा शिवसिनिकाना नवीन दिशा देणारा ठरेल.अस यावेळी पाटील म्हणाले. एखाद्या वेळेस चिन्ह इकडं तिकडं होईल पण दसरा मेळावा हा ठाकरेंनीच करावं अस देखील पाटील यावेळी म्हणाले.