पुणे - राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर नवनवीन राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या नक्षलवाद्यांकडून खून करण्याचा प्रयत्न होता. परंतु, त्यांनी सुरक्षा पुरवण्यात वर्षा बंगल्यावरुन नकार दिला, असा खळबळजनक आरोप नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केला. त्यांच्या या आरोपाना दीपक केसकर, शुंभराज देसाई यांनीही दुजोरा दिला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Sharad Pawar Vs Eknath Shinde ) ते म्हणाले की याबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याशी मी चर्चा केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी होती. गडचिरोलीचं काम त्यांच्याकडे असल्याने त्यांना ऑडिशनल फोर्स देखील देण्यात आले होते. त्यामुळे यात अधिक काही चर्चा करण्याची गरज नाही, असे यावेळी पवार म्हणाले आहेत.
पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते -ते म्हणाले की, मला वस्तुस्थिती माहीत नाही, पण शासनात अनेक वर्ष काम केल्यानंतर मला एक गोष्टीची माहिती आहे. सुरक्षा कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची याबाबत कोरम आहे. ते कॅबिनेट असत नाही. ही चर्चा कॅबिनेटमध्ये होत नाही. ही चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव हे गृह सचिव डिजी अश्या सिनियर लोकाची एक कमेटी असते. यापुढे निर्णय आणि शिफारशी केल्या जातात. आणि मी याबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील ( Home Minister Dilip Walse-Patil ) यांच्याशी मी चर्चा केली होती. ते म्हणाले, की एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी होती. गडचिरोलीचं काम त्यांच्याकडे असल्याने त्यांना ऑडिशनल फोर्स देखील देण्यात आलं होतं. त्यामुळे यात अधिक काही चर्चा करण्याची गरज नाही, असे यावेळी पवार म्हणाले आहेत.