बारामती -एमआयएमने महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव ( MIM Praposal To Enter In MVA Government ) दिल्यानंतरगेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ( NCP Chief Sharad Pawar ) यावर प्रतिक्रिया दिली आहे. कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात, परंतू ज्यांच्यासोबत जायचं आहे. त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार -
कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात, परंतू ज्यांच्यासोबत जायचं आहे, त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे. हा खरं तर राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार राज्यातील नेत्यांना नाही. त्यामुळे महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत बातम्या येत आहेत. तो पक्षाचा निर्णय नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच आमच्या दृष्टीने हा विषय संपला असून संजय राऊत काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.