महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Brahmin Federation Criticizes Sharad Pawar : शरद पवारांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक; पवारांनी दिलगीरी व्यक्त करावी - Sharad Pawar

बाबासाहेब पुरंदरेच्या ( Babasaheb Purandare ) वक्त्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. शरद पवार ( Sharad Pawar ) इतिहासकार नाहीत. चरित्रकार एखादी कादंबरी लिहीत असताना त्यावर अन्याय कसा करू शकतो, हे पवार साहेबांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे ( Brahmin Federation President Anand Dave ) यांनी केली आहे.

Brhaman Magasagh On Shrad Pawar
शरद पवारांवर ब्राम्हण महासंघाची टीका

By

Published : Jul 23, 2022, 8:54 PM IST

पुणे -शरद पवारांच्या बाबासाहेब पुरंदरेच्या ( Babasaheb Purandare ) वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. शरद पवार इतिहासकार नाहीत. चरित्रकार एखादी कादंबरी लिहीत असताना त्यावर अन्याय कसा करू शकतो, हे पवार साहेबांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. याच्याही पुढे जाऊन आमची आता ही मागणी आहे की शरद पवारांनी ( shrad pawar ) शिवचरित्र लिहावं, कादंबऱ्या लिहाव्यात शिवछत्रपतींवर जो अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करावा. असा घणाघात ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केला आहे. तर, पवारांना जे शिवाजी महाराज अपेक्षित आहेत जे ब्राह्मण द्वेष्ठे होते, जय इस्लामला मानणारे होते. त्यांनी आरक्षण सुद्धा दिलं हे पवार साहेबांनी सांगावं अशी, टिका ब्राह्मण महासंघाने ( Brahmin federation criticizes Pawar ) केली आहे.

ब्राह्मण महासंघाची पवारांवर टीका

पवारांच्या वक्तव्याचा निषेध -बाबासाहेब पुरंदरे यांची भाषण आणि त्यांच्या लिखानएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कोणीच केला नाही. अस परखड मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. श्रीमंत कोकाटे यांच्या प्रकाशनावेळी शरद पवार पुण्यात आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावर ब्राह्मण महासंघाने आक्रमक होत शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मण संघटनांना भेटायला बोलावलं होतं आम्ही त्यांची ती भेट नाकारली होती. शरद पवार यांना ब्राह्मण द्वेषाचेच राजकारण करायचंय आणि त्यांच्या विचारात काही फरक पडणार नाही हे कारण सांगून आम्ही ती भेट नाकारली होती आणि दुर्दैवाने आमची ती भीती खरी ठरली. आज शरद पवार यांनी बोलताना बाबासाहेब पुरंदरेनी छत्रपतींवर अन्याय केला असं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. अस ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले आहे

हेही वाचा -कॅबिनेट मंत्री स्मृती इराणींच्या मुलीच्या रेस्टॉरंटला अवैध बार परवान्याबद्दल नोटीस

पवारांनी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करावी -आपण इतिहास तज्ञ नसताना आपला इतिहास अभ्यास नसताना फक्त जातीच राजकारण करण्यासाठी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदर आणि शिवछत्रपतींना वक्तव्यावरून राजकारणात सक्रिय करणे हे अत्यंत चुकीच आहे. यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

हेही वाचा -Sanjay Raut on EC : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर निवडणूक आयोग प्रश्न उपस्थित करते हे धक्कादायक - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details