पुणे- सिरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन कोरोनाची लस घेतल्याची माध्यमे माझ्याबाबत काहीही पसरवतात. पण, कोरोनाची लस नाही तर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी इंजेक्शन घेऊन आलो आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीचे कारण सांगितले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, की प्रतिकारशक्ती वाढविण्याचे मी इंजेक्शन घेतले आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील इंजेक्शन घेतले. लसीची प्रगती कुठपर्यंत पोहोचली आहे, हे समजून घेण्यासाठी सिरमला गेलो होतो. जानेवारी अखेरपर्यंत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लस बाजारात येईल, असे सिरमकडून सांगण्यात आल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-'हाथरसमध्ये लपवण्यासारखे काहीच नाही, तर मग विरोधीपक्षांना का रोखलं'