पुणे - एकदा तलवार हातात घेतली म्हणजे युद्ध जिंकायचं हेच आमचे उद्दिष्ट असते, अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याचा पक्षाच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावर परिणाम होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामागे बळ उभे करू. राज्याचे चित्र बदलण्यासाठी जे कष्ट करावे लागतील ते आम्ही करणार. असा दृढ निश्चय व्यक्त करत अजित पवारांच्या राजीनाम्याचा परिणाम पक्षावर होणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.
'विधानसभेची चिंता करू नका, एकदा हातात तलवार घेतली की युद्ध जिंकायचीच तयारी असते'
अजित पवार यांच्या राजीनाम्याचा विधानसभा निवडणूक लढवण्यावर कोणताही परिनाम होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागे बळ ऊभे करेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
उदयनराजे यांना दिल्लीतला गाडी बंगला मी देतो. फक्त त्यांनी दिवसा बंगल्यावर राहायला यावे. असा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला. सातारा लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तीन ते चार नावांचा विचार सुरू असल्याचे ही पवारांनी सांगितले.