पुणे - राज्यातील राजकीय परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून बदलली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप ( Maharashtra Alligation Politics ) तसेच थेट हल्ले होत असून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. तसेच नुकतंच राणा दाम्पत्यांकडून ( Navneet Rana ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा कार्यक्रम ( Hanuman Chalisa Contraversy ) ठेवण्यात आला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar Reaction On Hanuman Chalisa Row ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल, असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात, असे शरद पवार म्हणाले. सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
'महाराष्ट्रात असं कधी नव्हतं' -'एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल, असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं', असं म्हणत पवार यांनी राणा दांपत्याच्या भूमिकेवर टीका केली आहे.
'ही महाराष्ट्राची खरी संस्कृती' -मी राज्यात खूप काम केलं. बाळासाहेब आणि माझ्यात जाहीर इतके मतभेद असायचे की शब्द एकमेकांबद्दल वापरायचो. काटकसर आम्ही दोघांनी कधीही केलं नाही.परंतु ती बैठक संपल्यावर संध्याकाळी मी त्याच्या घरी जायचो किंवा ते माझ्या घरी यायचे. कधीकधी तर जाहीर सभेत बोलल्यावर ज्येष्ठ नेत्यांच्या घरी एकत्र रात्र घालवायचो. पण सभेत काय झालं याची चर्चा देखील होत नव्हती. ही महाराष्ट्राची प्रथा आहे, पण दुर्दैवाने अलीकडे नाही त्या गोष्टी पाहायला मिळत आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.